मुंबई - मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सीमा देव यांचा मुलगा-अभिनेता अजिंक्य देव यांनी टि्वट करून याविषयी माहिती दिली.

माझ्या आईला अल्झायमरच्या आजाराने ग्रासले आहे. ती या आजारांशी झुंज देत आहे, असे लिहित आम्ही सर्व कुटुंबीय तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत असल्याची माहिती त्यांनी टि्वट केली. महाराष्ट्रातील चाहत्यांना सुद्धा आपल्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती त्यांनी केली.

अजिंक्य देव यांचे टि्वट...
'माझी आई श्रीमती सीमे देव अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. तसेच तिच्यावर प्रेम करत असणाऱ्या महाराष्ट्रातील चाहत्यांनी त्या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करा.'

सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. सीमा देव यांच्या 'सुवासिनी', 'जगाच्या पाठीवर', 'आनंद' अशा अनेक चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या आहेत.