मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोना झपाट्याने वाढत आहे. सोमवारीच मुंबईने दोन लाखांचा कोरोना रुग्णांच्या टप्पा ओलांडला असतांना राज्य सरकार खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा विचार करत असल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली.
मंत्री ठाकरे या मुलाखतीत म्हणाले की, खासगी कार्यालये टप्प्या टप्प्याने सुरु करणार आहे. कार्यालये २४ तास सुरु ठेवायची का? नाही. याबाबत कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. तसेच रेस्तराँ सुरु करण्याचाही विचार आहे. हळूहळू आम्ही सगळ्या गोष्टी सुरु करणर असल्याचे ठाकरे यांनी मुलाखतीत स्पष्ट केले. लोकांनी शिस्त पाळण्यावर अवलंबून असणार आहे. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करुन देणे, वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देणे, ही जशी सरकारची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आपण घराबाहेर पडताना आपली काळजी घेणे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ न देणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. आपण आपली काळजी घेतली नाही, तर आपला धोका वाढवत नाही, तर कुटुंबाचाही धोका वाढवतो आहो. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. बाहेर पडताना सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करणे बंधणकारक आहे. सोशल डिस्टन्सिंगही पाळले गेले पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले.