मुंबई : ठाकरे सरकारने राज्यातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभुमीर मार्च महिन्यात शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने राज्यातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहण्याचा निर्णय आजच्या मंञीमंडळात ठाकरे सरकारने घेतला आहे.
राज्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी व नियमित वर्गासाठी बंद राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण सुरु करण्याची मुभा दिले आहे. ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण, दूरस्थ शिक्षण, टेलि काऊन्सिलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील ५० टक्के शिक्षक व शिकक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाइन, ऑफलाइन, दूरस्थ शिक्षण संस्थांशी संबंधित कामांसाठी तातडीने कामावर हजर राहण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहे.