नाशिक : देशात कोरोना लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केला आहे, अशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. कोरोना विरोधातील लढाईत भारताचे हे मोठे यश असल्याचा सांगण्यात येत आहे. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक मोठा खुलासा केला आहे. देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या आहे, असा खुलासा देखील राऊत यांनी केला आहे. इतकेच नाही ते पुराव्यासह सिद्ध करु, असे राऊत  यांनी जाहीर केले आहे.
एकीकडे चीनी सैन्य भारतात घुसखोरी करत आहे. जम्मू-काश्मिरमध्ये हिंदूंचे हत्याकांड सुरु आहे. तर दुसरीकडे देशात लसीचे उत्सव साजरे करण्यात येते आहे, अशी जोरादर टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. वाढती महागाई, पेट्रेल-डिझेलचे वाढते दर यावर कुणी बोलत नाही, असे देखील राऊत म्हणाले.