मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्यावरही यंदा कोरोनाचे संकट ओढावले आहे. दरवर्षी शिवाजी पार्क येथे दसऱ्याशी दिवशी शिवसेनेकडून दसरा मेळावा घेतला जातो. यावेळी मुंबईत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्याची शक्यता दाट वर्तवली जात होती. दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु आता शिवसेनेचे खासदार यांनी दसरा मेळाव्यावर मोठे विधान केले आहे. यावर्षीचा दसरा मेळावा व्यासपिठावरच होणार, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

दसरा मेळावा घेण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरु आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण व्यासपिठावरूनच होणार आहे. दसरा मेळाव्याचे महत्व राजकिय आणि सांस्कृतिक देखील आहे, त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याची चर्चा होत आहे, नियमांनुसार मेळाव्याचे नियोजन केले जाणार आहे, असेही राऊत म्हणाले.

सध्या राज्यातील सांस्कृतिक, राजकिय आणि धार्मिक कार्यक्रमांवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे यावर्षी शिवसेना दसरा मेळावा ऑनलाईन होण्याची शक्यता शिवसेनेच्या सूत्रांनी दिली होती. परंतु आता उद्धव ठाकरे व्यासपिठावरूनच शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. 

कोरोनाचे संकट जसजसे वाढते जात आहे, तसे गर्दी न करण्यास सरकारकडून आदेश दिले जात आहेत. त्यामुळे यावर्षी भारतीय संस्कृतीतील सर्वच सणांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच शिवसेनेची गुढीपाडव्याला निघणारी यात्राही रद्द झाली होती. आता शिवसेनेचा दसरा मेळावाही रद्द होण्याची दाट शक्यता आहे. येत्या 25 ऑक्टोबरला दसरा आहे. यावर्षीचा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी अगदी खास असणार आहे. कारण ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेली आहे. त्यात पुन्हा शिवसेनाची सत्ता आणि मागील एक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी केलेली कामगिरी, या सर्व गोष्टी लक्षात घेता, हा दसरा मेळावा खरंच शिवसेनेसाठी खास असणार आहे. 

शिवसेनेच्या इतिहासात आतापर्यंत दोन वेळा दसरा मेळावा रद्द झाला होता. 2006 मध्ये मुसळधार पावसामुळे आणि 2009 मध्ये विधानसभा निवडणूकीत मेळावा पुढे ढकलण्यात आला होता.