नगर : शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला असला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच कायम राहते. त्यात बदल होत नाही. हा नारायण राणे… तो आमका असे म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असेच म्हटले जाते, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना काढला आहे.
नगर येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केलेले आहे. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतता. शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटले तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असे सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल, असे राऊत यावेळी म्हणाले आहे. यावेळी त्यांनी नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे असे सांगितले आहे. शंकरराव गडाख निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.