कोची - केरळमधील सबरीमाला मंदिर शनिवारपासून भाविकांसाठी उघडण्यात आले आहे. सात महिन्यांनंतर 5 दिवसांच्या मासिक पुजेसाठी हे मंदिर खुले करण्यात आले आहे. यावेळी मंदिरात ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे आहे, त्यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करून सर्व नियम पाळणे गरजेचे आहे.

तसेच प्रत्येकाने तोंडाला मास्क लावून कोविड-19 चाचणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत घेवून येणे देखील गरजेचे आहे. दररोज या मंदिरात केवळ 250 भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.

आज 246 भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. 10 ते 60 वर्षांपर्यंतच्या वयाच्या लोकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून मंदिर प्रशासनाने कडक नियम बनवले आहेत.

तसेच ज्या भाविकांकडे कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र नसेल, अशा भाविकाला जवळच्या नीलकमल बेस कॅम्पमध्ये रॅपिड अँटिजन चाचणी करावी लागेल, त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ही आले तरच त्या भाविकाला मंदिरात जाण्याची परवानगी दिली जाईल.