मुंबई - अभिनेत्री पायल घोष दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिंक अत्याचार केल्याचा आरोप लावल्यानंतर चर्चेत आली. तिने आता आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. पायलने टि्वट करुन पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे.

पायल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टि्वट करुन म्हणाली, 'सर ही माफीया गँग मला मारुन टाकतील आणि माझ्या मृत्यूला आत्महत्या किंवा इतर वळण देतील.'

यापूर्वी पायलने पंतप्रधानांकडे वाय-सिक्युरिटीची मागणी केली होती. तिने अनुराग कश्यपच्या विरुद्ध एफआयआर दाखल केल्यापासून तिला आणि तिच्या वकिलांना मारुन टाकण्याच्या धमक्या येत आहेत.

पायलने अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करुन अनुराग Metooचा आरोप केला होता. याप्रकरणी तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपची 8 तास चौकशी करण्यात आली होती. मात्र अनुराग कश्यपने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

पायल घोष आणि ऋचा चड्ढाचा वाददेखील मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. पायलने अनुरागवर लैंगिक अत्याचारा आरोप करताना ऋचाचे नाव घेतले होते. त्यानंतर ऋचाने पायलवर मानहानीचा दावा ठोकला होता. ऋचाने हा दावा जिंकल्याचेदेखील तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन सांगितले होते.

पायल घोषचे टि्वट...