मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे, मुंडे यांच्यावरील संकट टळल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, "आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झालय" असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. 
शरद पवार  या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज आहे, असे मी आधीच म्हटले होते. सत्य समजल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नाही. आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झालय" असे शरद पवार म्हणाले आहे. 
 रेणू शर्मा या तरूणीने काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण आता रेणू शर्माने तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे, मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.