मुंबई : शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठाण स्पर्धेच आयोजन केले आहे. या स्पर्धेमुळे भाजपने हिंदूत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेची बाजूने राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक मैदानात उतरले आहेत. नवाब मलिक यांनी भाजपला सडोतोड प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक म्हणाले, गीता पठणात मुस्लिम मुलीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षण-कला-स्पर्धा-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका,असे नवाब मलिक म्हणाले आहे.
यावेळी, नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने अजान स्पर्धा सुरु केली असल्यामुळे भाजपकडून त्यावर आक्षेप घेतला जातो आहे. मात्र सोलापूर आणि इतर ठिकाणी गीता पठण कार्यक्रमामध्ये मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला आहे, ही देखील सत्य परिस्थिती असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. देशामध्ये कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे अयोग्य आहे. दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमेमध्ये जे रोल केले आहेत किंवा मंदिरामध्ये सीन केले आहेत, त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी धर्मांतर केलयं. कलेला, अभिनयाला, स्पर्धेला धर्माचा चष्मा लावणे अयोग्य आहे, हे भाजपला कळाले पाहिजे, असे मलिक म्हणाले आहे.

फडणवीसांनी मराठा समाजाच्या बाजूने निकाल लावावा : मराठा आरक्षणाविषयी बोलताना मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यावरुन सुप्रीम कोर्टाने दिले असते तर देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींजवळ आग्रह धरला पाहिजे आणि निकाल मराठा समाजाच्या बाजूने लावून घ्यावावा, असे मलिक यांनी देवेंद्र फडणविसांना सुचवले आहे.