मुंबई : राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टि्विट करत दादा लढवय्ये आहे, लवकर बरे होतील अशा सदिच्छा दिल्या आहेत.

[removed][removed]


सुप्रिया सुळे आपल्या टि्विटमध्ये म्हणतात की, अजितदादा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाले आहेत. दादा लढवय्ये आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन लवकरच सर्वांच्या सोबत येतील. दादा,लवकर बरे व्हा, असे त्या म्हणाल्या आहेत.