मागील चार ते पाच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे राज्यातील सर्व मंदिर-मशिद-गुरूद्वारा-चर्च आदी धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्य शासनाने लवकरात लवकर सर्व धर्मियांची धार्मिक उघडण्याच्या मागणीसाठी खडकेश्‍वर येथील मंदिर उघडण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर बुधवारी दि.2 एमआयएएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तिजया जलील हे शहागंज येथील मशिद उघडण्यासाठी जाणार होते. तेथे जात असताना मध्येच पोलिसांनी त्यांना रोखत ताब्यात घेतले. तथापि, सरकारने लवकरात लवरक धार्मिक स्थळे न उघडल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.