मुंबई : देशात कोळसा तुटवडा निर्माण झाला आहे. या कोळसा तुटवड्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 
मंञी मलिक पुढे म्हणाले की, देशात कोळसा मिळत नाही आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच बंद पडलेले आहे. आयात कोळसा करुनही तो उपलब्ध होत नाही. आयातीमुळे या देशातील जे परकीय चलन आहे ते जास्त खर्च होत आहे. युपीए सरकार असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भविष्यात आपल्याला जास्त वीज लागणार आहे. याची निर्मिती झाली पाहिजे. त्याची पॉलिसी निर्माण केली. कोळशाच्या खाणी वितरीत करण्यात आल्या. त्यावेळी भाजपने कोळसा घोटाळा झाला म्हणून बोंब ठोकली होती. त्यामुळे ते रद्द करण्यात आले होते. कालांतराने त्या खाणी काही लोकांना देण्यात आल्या त्या आजपर्यंत त्या सुरू करण्यात आलेल्या नाही, असे आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे. खाणीत कोळसा असताना खणीकरण होत नाही. कोळसा परदेशातून आयात होतो. या सगळ्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे, असा गंभीर आरोप मंञी मलिक यांनी केला आहे.