बीड: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर सर्वञ संताप व्यक्त होत असताना बीड जिल्ह्यातील केतुरा येथील विद्यार्थ्यांने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. विवेक कल्याण रहाडे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या आत्महत्येमुळे राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे.


विवेक हा बारावी पास होता. विवेकवे नेटकिच 'नीट'ची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुऴे त्याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. 'मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी आताच 'नीट' परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल,' असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.