(संग्रहित छायाचिञ)

मुंबई : राज्यभरातील अकृषी विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा 1 ते 21 ऑक्टोबर दरम्यान घेण्याचे ठरवल्याने सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांची अडचण निर्माण झाली होती. सीईटी आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा एकाच वेऴी कशा देता येणार असा प्रश्न विद्यार्थांसमोर उभा ठाकला होता. माञ, राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सीईटी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.


सीईटी परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेण्याचे आधी जाहीर केले गेले होते. तर दुसरीकडे, अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अभियांत्रिकी, औषधनिर्मिती शास्त्र प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षेच्या वेळापत्रक कोणताही बदल केला नसून, 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
सीईटी प्रवेश परीक्षा या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या, चौथ्या तर काही सीईटी प्रवेश परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे जाहीर केले आहे. सीईटी परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.