मुंबई - अभिनेत्री कंगना रानौटने मुख्यमंत्रई उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही, असे कंगनाने टि्वट करुन म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात कंगनावर जोरदार हल्ला चढवला होता. कुणीतरी म्हटले होते, की मुंबई पीओके प्रमाणे आहे, घरी खायला मिळत नाही, मग मुंबईत यायचे आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशा शब्दांत कंगनावर ठाकरेंनी टीका केली होती. यावर कंगनाने टि्वट करुन पलटवार केला.

यावर कंगनाने, 'ज्या प्रकारे हिमालयाचं सौंदर्य प्रत्येक भारतीयांसाठी आहे. त्यानुसारच मुंबईही सगळ्यांची आहे. तिथे मिळणाऱ्या संधी या प्रत्येक भारतीयांसाठी आहेत. उद्धव ठाकरे, आम्हाला लोकशाहीनं दिलेला अधिकार हिरावण्याचा प्रयत्न करु नका. आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करु नका. तुमची भाषणं तुमची अकार्यक्षमता दाखवतात.'

[removed][removed]

इतक्यावर कंगना थांबली नाही, तिने आणखी एक टि्वट करुन टीका केली. 'मुख्यमंत्री, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकसेवक असून तुम्ही अगदी शुल्लक गोष्टींवरुन संघर्ष करत आहात. तुमच्याजवळ असलेली सत्ता तुमच्या मताशी सहमत नसलेल्यांचा अपमाप करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करुन मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी.'

[removed][removed]

तिने अजून एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. 'मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? ते फक्त जनतेचे सेवक आहेत. त्यांच्यापूर्वी कुणी होतं, त्यांच्यानंतरही कुणीतरी त्यांची जागा घेईल. ते महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीच्या असल्यासारखं का वागतात?'

[removed][removed]