मुंबई - आपल्या बेधड वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगणा रानौतने पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. कंगणाने टि्वट करून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने 'मुंबईत काय गुंडराज सुरु आहे' असा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे हे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचेही ती म्हणाली.

कंगणा आपल्या टि्वटमध्ये म्हणते, 'साहिल चौधरीने महाराष्ट्र सरकारच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. परंतु पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात बलात्काराची तक्रार देऊन तो मोकाट फिरतोय. मुंबईमध्ये हे सगळं काय सुरु आहे. '

साहिल चौधरी एक युट्युब ब्लॉगर आहे, त्याने सुशांत सिंह राजूपतच्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर आरोप केले होते. त्याने आक्षेपार्ह भाषेत व्हिडिओ पोस्ट केला होता. एका महिला वकिलाने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

'मुंबईमध्ये काय गुंडराज सुरु आहे. जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या टीमला कुणीच प्रश्न विचारत नाहीत. आमची घर तोडणार, आम्हाला मारणार? त्यांना आमच्यासोबत काय करायचे आहे? याला उत्तरदायी कोण आहे?' असा प्रश्न कंगणाने आपल्या दुसऱ्या टि्वटमध्ये केला आहे.

कंगणाचे टि्वट...