दुबई - पहिल्या सामन्यात पंच्याच्या चुकिच्या निर्णयामुऴे पराभव स्विकारावा लागेलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आता विजयी ट्रॅकवर परतला आहे. दोन जिवदान मिऴालेल्या सामनावीर लोकेश राहुलच्या (१३२) रनची नाबाद खेऴी पाठोपाठ बिश्नोई (३/३२) आणि एम. अश्विनच्या (३/२१) अचूक माऱ्याच्या बऴावर पंजाब संघाने गुरुवारी लीगमधील दुसऱ्या सामन्यात बंगळुरूच्या फलटनला पराभूत केले. पंजाबच्या संघाने १७ षटकांत ९७ धावांनी विजयश्री खेचून आणली. या सामन्यात दोन जिवदान मिऴालेल्या सामनावीर के.एल.ने विराट सेनेला धो-धो धुतले.


किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ गड्यांच्या मोबदल्यात बंगळुरूच्या टीमसमोर विजयासाठी २०७ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले होते. मात्र, रवी बिश्नोई व अश्विनच्या भेदक माऱ्यासमोर विराट सेनेचे कंबरडे मोडले. पंजाबच्या संघाने बंगळुरू संघाला अवघ्या १०९ धावांवर रोखले. बंगळुरू संघाकडून युवा फलंदाज वॉंशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली.
पंजाबच्या लोकेशची ६९ चेंडूंत १४ चौकारांसह १३२ धावांची खेळी केली. सत्रातील पहिले शतक साजरे किंग्ज इलेव्हनचा सलामीवीर आणि कर्णधार लोकेश राहुलने गुरुवारी आयपीएलच्या १३ व्या सत्रामध्ये खणखणीत शतक साजरे केले. त्याने ६९ चेंडूंचा सामना करताना झंझावाती खेळीच्या बळावर १४ चौकार आणि सात उत्तुंग षटकार ठोकले. यासह त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली.