मुंबई : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. मुंबई महापालिका वगळता अन्य महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या सदस्य संख्येत 15 टक्के वाढ करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. येत्या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका आता तोंडावर आहेत, त्यापूर्वी ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीला लगाले आहे. पण असे असले तरी मुंबई महापालिकेत नगरसेवक वाढविण्याला सेनेला रेड सिग्नल मिळाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यात मुंबईसह सध्या 27 महापालिका आणि 379 नगरपालिका- नगरपंचायती आहेत. दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग त्या शहरासाठी प्रभाग रचना करून त्याप्रमाणे निवडणुका पार पाडते.