मुंबई: राज्य सरकारमधील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती सामंत यांनी ट्वीट करून दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे सामंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

[removed][removed]


सामंत आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, 'गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. नुकतीच कोविड टेस्ट करून घेतली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेले दहा दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होईन, असे सामंत यांनी म्हटले आहे.