नवी दिल्ली : हरियाणा आणि पंजाबसह देशातील अनेक भागांत कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यातच मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांचे सुरु असलेले अंदोलन पेटले आहे. आंदोलनकर्त्यांनी आज दिल्लीत इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर जाळले. या विधयकावरून पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून अंदोलन करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच काँग्रेसनेही विरोध दर्शवण्यासाठी देशभरात अंदोलन सुरु केले आहे.

राष्ट्रपतींनी कृषी विधेयकाला दिली मंजूरी...
संसदेत मागील आठवड्यात शेतकऱ्यांसंबंधी 3 विधेयक पास करण्यात आले. त्यानंतर संसदेत गदारोळ निर्माण झाला होता. गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांना सभापती वैंकय्या नायडू यांनी निलंबित केले होते. त्यानंतर विरोधी पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेवून विधेयक मंजूर न करण्याची मागणी केली. परंतु राष्ट्रपतींनी रविवारी कृषी विधेयकाल मंजूरी दिली.

या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, तसेच सरकार येत्या काळात आधारभूत किंमत प्रणाली संपवू शकेल, अशी भीती विरोधी पक्षाला आहे. परंतु हे विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मंजूर केले असून त्यांचे आधारभूत किंमत प्रणाली कायम राहणार असल्याचे सरकारने सांगितले.

कृषी विधेयकाच्या विरोधात असलेला अकाली दल एनडीएतून बाहेर...
कृषी विधेयकाच्या विरोधात असलेल्या शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि मोदी मंत्रिमंडळात अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजिनामा दिला आहे. शनिवारी अखेर अकाली दल एनडीएतून बाहेर पडला.