नवी दिल्ली - सणासुदी काळात विशेष गाड्या चावण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. ऑक्टोबर-नोव्हेबर हा महिना सणासुदीचा मानला जातो. दुर्गापुजा, दसरा, छठ पुजा, दिवाळी असे विविध सण असतात. त्यामुळे सुट्यांमुळे प्रवाशांची वाढली मागणी लक्षात घेवून विशेष गाड्या सुरु करण्यात येणार आहे.

196 जोड्या म्हणजेच 392 विशेष गाड्या धावणार असल्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली. फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन म्हणून या विशेष गाड्या धावतील. या विशेष गाड्या कोलकाता, पाटणा, वाराणसी, लखनऊ आणि इतर ठिकाणी चालविण्यात येणार आहेत. या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या 24 विशेष गाड्या...
सणासुदीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी 12 जोड्या म्हणजेच 24 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या 156 फेऱ्या असतील. पश्चिम रेल्वेने टि्वटवरून माहिती दिली, की 12 जोड्या विशेष गाड्यांपैकी 5 जोड्या वांद्रे टर्मिनसहून, 2-2 जोड्या इंदोर आणि उधनाहून धावतील. तर प्रत्येकी एक-एक जोड्या ओखा, पोरबंदर आणि गांधीधाम स्टेशनहून धावणार आहेत. या सर्व गाड्या पूर्णत: अरक्षित आहेत.

[removed][removed]