मुंबई : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच विरोधकांना दम ठोकला आहे. खडसे म्हणाले, जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केलं? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन,असे एकनाथ खडसे म्हणाले आहे.
एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी, बोलताना खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी थेट विरोधकांना आव्हान केले आहे. ते म्हणाले जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? असे खडसे म्हणाले.
खडसे पुढे बोलताना म्हणाले की, आज मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला नसता तर माझ्यावर राजकीय संन्यास घेण्याची वेळ आली असती. आता मला मार्गदर्शन करायला सांगणारे नेते चार दिवसांपूर्वी भाजपमध्ये आले आहेत. तुम्हाला पहाटे पाच वाजता शपथेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चांगला वाटला होता. तसाच तो मला आज चांगला वाटतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले.