बारामती : परतीच्या पावसाने बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज सकाळीच बारामतीत दाखल झाले होते. या दौऱ्यावर असतानी अजित पवारांनी नद्यांसह ओढ्याभोवतीची अतिक्रमणे काढण्याचे सांगीतले. यावेळी, अजित पवार म्हणाले की, नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणे तातडीने हटवा. यात माझे- अजित पवारांचे अतिक्रमण असेल तरीही मागेपुढे पाहू नका.
अनेक नदीपात्र आणि ओढ्यानां अतिक्रमणाने घेरले आहे. त्यामुळे, अतिवृष्टी किंवा पुराच्या काळात मोठे नुकसान होत आहे. यामुळे, नद्यांसह ओढ्याचे अतिक्रमणे त्वरीत हटवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्याचवेळी अतिक्रमणे काढताना कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका, भले ते अतिक्रमण अजित पवारांचे असले तरी काढून टाका, अशा सुचना अजित पवारांनी दिल्या.

सात वाजता अजित पवार भिगवणगांवात : अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजताच बारामती शहरातील भिगवण गावात दाखल झाले. भिगवण गाव रस्त्यावरुन अजित पवार बाधित क्षेत्राची पाहणी केली. पवार यांनी भिगवण रस्त्यासह तांदुळवाडी, चांदगुडे वस्ती, खंडोबानगर, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, पाहुणेवाडी, गुणवडी परिसराची पाहणी केली. त्यानंतर सणसर, जंक्शन, निमगाव केतकी येथे पाहणी करून त्यांनी उजनी धरण परिसरात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.