मुंबई : राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू झाल्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार, असा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत होता. कोरोनामुळे दीर्घकाळापासून बंद असलेली महाविद्यालये आात २० ऑक्टोबर पासून होणार आहे, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
यावेळी बोलताना मंञी उदय सामंत म्हणाले की,२० ऑक्टोबर पासून राज्यातील कॉलेज सुरु होणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्या त्या जिल्ह्यातली परिस्थिती पाहून हे ठवरले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा एकच डोस झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मंञी सामंत यांनी स्पष्ट केले आहे.