मुंबई : महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त तसेच अतिवृष्टी बाधितांसाठी आता ठाकरे सरकारने मोठ्या मदतीची घोषणा केली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केलेली आहे.
ठाकरे सरकारने केलेल्या घोषणेनुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आलेले आहे.

ही मदत खालीलप्रमाणे 

जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर

बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर

बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर

ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.