मुंबई : भाजपने खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, असा टोला शरद पवारांनी लागावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवास्थानी आल्यानंतर त्यांनी पञकारांशी संवाद सधला. यावेऴी पवार बोलत होते.
केंद्रीय मंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. याबाबद पञकारांनी शरद पवारांना विचारले असता, ते म्हणाले रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? खासदार तरी आहे का ?ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांची कोणी गांभीर्याने नोंद घेत नाही,असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार पुढे बोलताना म्हणाले की, रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? एक खासदार तरी आहे का? ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांची कोणी गांभीर्याने नोंद घेत नाही, सभागृहातही घेत नाही आणि बाहेरही घेत नाही. शरद पवार यांनी यावेळी सुशांत प्रकरणावरुन टीका करताना सीबीआयने आतापर्यंत काय दिवे लावले आहेत हे मला अजून दिसलेले नाही. भलतीकडे सगऴे चालले आहे असे पवार म्हटले.