(संग्रहित छायाचिञ)

औरंगाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनतंर राजकीय क्षेञात चर्चांना उत आला आहे. या भेटीबाबाद राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले,राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी होत असतात. त्यातून राजकीय अर्थ काढू नये, असे दानवे यांनी स्पष्ट केले. दानवे महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलतांना म्हणाले, हे तीन पक्षांचे सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल, तर दोष आम्हांला देऊ नये,असा टोला मंत्री दानवे यांनी लगावला.
संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक मुंबईत येथील हयात हॉटेलमध्ये शनिवारी (26 सप्टेंबर) बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. चर्चेचे नेमके कारण अस्पष्ट असल्याने राजकीय गोटात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. राऊत-फडणवीस भेटीवर देखील राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केले. राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी होत असतात. त्यातून राजकीय अर्थ काढू नये असे दानवे यांने स्पष्ट केले.

राऊत,दानवे यांच्यात दिल्लीत चाय पे चर्चा :
दानवे म्हणाले, अशी भेट माझ्यात आणि संजय राऊतांमध्ये देखील झाल्याचे दानवेंनी सांगितले. दिल्लीत मॉर्निंग वॉकला जात असताना भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी मला चहाचे निमंत्रण दिले होते. म्हणून त्यांची भेट घ्यायला गेलो होतो असे दानवे म्हणाले.