मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर राजकारणाने पेट घेतला आहे. विविध नेते या प्रकणावर प्रतिक्रिया देत आहे. प्रताप सरनाईकांवर ईडीने केलेली कारवाई म्हणजे राजकीय सुडबुद्धी आहे, अशी टीका महाविकास आघाडीने केली आहे. या टीकेला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दानवे म्हणाले की, ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. उद्या माझ्याही घरावर पडू शकतो, प्रताप सरनाईक स्वच्छ असतील तर त्यांनी ईडीला घाबरायचे कारण नाही, असे दानवे म्हणाले आहे.
दानवे पुढे म्हणाले की, ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. उद्या माझ्याही घरावर पडू शकतो.आपण स्वच्छ आल्यास ईडीला घाबरायचे कुठलेच कारण नाही. प्रताप सरनाईक स्वच्छ असतील तर त्यांनी ईडीला घाबरायचे कारण नाही, असे रावसाहेब दानवे यांनी म्हणाले आहे.