रत्नागिरी : राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकञ येत महाविकास आघाडी स्थापन केले आहे. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषध घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सरकारला एक वर्ष पूर्ण झाले, पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही, असे राणे म्हणाले आहे.तसेच, नारायण राणे यांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी मुख्यमंञी ठाकरे यांच्यावर केली आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. 'सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही, असे राणे म्हणाले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला. हा त्यांचा पायगुण. कोरोना आला आणि संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचा कोणत्याच क्षेत्रात अव्वल नंबर आला नाही. इतकी महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे, अशी टीका राणे यांनी ठाकरेंवर केली आहे.