मुंबई - योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात लव्ह-जिहाद विरोधात कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. शिवराज सरकारदेखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल ठेऊन मध्यप्रदेशात हा कायदा आणण्याचा विचार करत आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारनेदेखील लव्ह-जिहाद कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

'उत्तर प्रदेशात सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची पूर्ण तयारी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. उत्तर प्रदेशसारखा कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू,' असे सोमय्या म्हणाले.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, 'मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याकूब मेननच्या फाशीला विरोध केला होता. फेनेटिक इस्लामिकऑरगनाझेशन संघटनेचंदेखील त्यांच्याकडून समर्थन करण्यात आले होते. परंतु आम्ही महाराष्ट्रात लव्ह-जिहाद होऊ देणार नाही.'

'अस्लम शेख लव्ह जिहादवर जी भाषा बोलतात तीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात.' अशी टीका सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर केली.