मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर टिका केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, समाधान मानण्यावर असते. काही लोक लिमलेटची गोळी मिळाली तरीही समाधानी होतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी हे पाहूयात, असा टोला पाटील यांनी खडसे यांना लगावला.

दोन तास उशीर का ?
आज खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशाची वेळआज दुपारी २ वाजता होती. त्या प्रवेशालाच दोन तास लागले, आता पाहू पुढे काय होते. पक्षाने नाथाभाऊंना पुष्कळ दिले आहे. खडसेंच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण ते काही भाजपात थांबले नाहीत. राष्ट्रवादी काय देताय ते पाहू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.