मुंबईः शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठाण स्पर्धेच आयोजन केले आहे. या स्पर्धेमुळे भाजपने हिंदूत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पर्धेच्या घोषणेनंतर भाजपने शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टि्वटकरत शिवसेनेला धारेवर धरले आहे. ते म्हणाले, या पुढे दसरा मेळाव्यानंतर नारा ए तकबीर... अल्ला हू अकबरच्या घोषणा ऐकू येणार, बहुतेक, असा टोला शिवसेनेला लगावला आहे.

[removed][removed]
[removed][removed]


अतुल भातखळकर टि्वटमध्ये लिहीतात की, शिवसेनेनं अजानच्या स्पर्धा जाहीर करणं म्हणजे हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं आहे. अजान आता शिवसेनेला गोड वाटू लागलं आहे. ओवेसींनाही लाज वाटेल इतके धर्मनिरपेक्ष आता शिवसेना झाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तर त्यांनी केव्हाच सोडलं होतं. आता साधं हिंदुत्वही शिवसेनेला मान्य नाहीये, असा हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केला आहे.