मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली. मराठा आरक्षण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची राज्य सरकारची मागणी न्यायालयाने मान्य केल्याचा दावा मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने आज न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली. यावेळी हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची राज्य सरकारची मागणी न्यायालयाने मान्य केला आहे, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आपल्या हातात काही नाही : अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली पाहिजे, असे सरकारला वाटते. माञ, आपल्या हातात काहीही नाही. मराठा समाजाने आक्रमक होता कामा नये. न्यायालयीन लढाई ही रस्त्यावर लढून चालणार नाही. आपल्याला घटनापीठासमोरच आपली बाजू मांडावी लागेल असे चव्हाण म्हणाले.