मुंबई - अनलॉकच्या ५ व्या टप्प्यात ठाकरे सरकारने अखेर जिम सुरु करण्याची परवानगी दिली आहे. २५ तारखेपासून कन्टेनमेंट झोन वगळता राज्यातील जिम सुरु होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन जिम सुरु केले जावेत, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. परंतु आता टप्प्याने राज्यातील उद्योग, व्यावसाय सुरु केले जात आहेत. तसेच जिम सुरु करण्याच्या निर्णयाबरोबरच बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेने चालविण्याची परवानगी दिली आहे. तसेच पत्र राज्य सरकारने प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे आता लवकरच पूर्ण क्षमतेने बेस्ट बस सुरु होणार आहेत.