मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर साखर कारखान्यावरून जोरदार टीका होतीये. या टीकेला मंञी अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या समोर आल्या आहे. मी अनेकदा उत्तर देणे टाळले आहे. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली आहे. मात्र या चौकशीत काहीही उजेडात आलेले नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहे. 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे, असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यावेळी अजित पवार यांनी राज्यातील विकल्या गेलेल्या कारखान्यांची भलीमोठी यादी वाजून दाखवली आहे. त्यांनी कारखाने विक्रीच्या व्यवहाराचे रकमांसह वाचन करुन दाखवले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एकूण 30 कारखाने विकले आहे, अशी यादी अजित पवार यांनी सांगितली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, राज्य शिखर बँकेने राज्यातील वेगवेगळे 30 सहकारी साखर कारखाने विकलेले आहे.  सहा सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकानी विकले. सहा सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले आहे. तीन सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले. बारा सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चालवण्यास देण्यात आलेले आहे, अशी माहिती मंञी अजित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील 64 सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेलेत किंवा एकाने विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिलेत किंवा भाडेकरारावर चालवले जात आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्याबाबबत सतत माझ्या कुटुंबांचा सतत उल्लेख केला जातो. मला लोकांना सांगायचे आहे  की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बॅंकेने जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे देखील सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी म्हटले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
मंञी अजित पुढे म्हणाले की, नियम सर्वांना सारखेच आहे. आज सगळी कागदपञे घेऊन आलो आहे, असे ते सुरुवातीला म्हणाले. ड्रग्ज प्रकरणात कुणाचाही मुलगा असेल तर त्यावर कारवाई करावी, असे देखील अजित पवार म्हणाले आहे.