चंद्रपूर - समाजसेविका आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज (३० नोव्हेंबर) आत्महत्या केली आहे. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असणाऱ्या शीतल आमटे यांची फेसबूक आणि टि्वटरवरील शेवटची पोस्ट सध्या चर्चेत आहे. शीतल आमटे यांनी त्यांच्या टि्वटर आणि फेसबुकला एक पेंटिंग शेअर केली आहे. हे पेंटिंग त्यांनी स्वत: काढले होते. त्यांचे नाव आणि २९ नोव्हेंबर ही तारीखही या पेंटिंगवर आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी 'War and Peace' असे कॅप्शन दिले आहे. परंतु, आता त्यांच्या जाण्याने या पेंटिंगचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
डॉ. शीतल आमटे यांचे पार्थिव चंद्रपुरात शवविच्छेदनासाठी दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन होणार आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
शीतल आमटे आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या आहेत. आनंदवनच्या संचालनातील अधिकारपदावरून आमटे कुटुंबियात गेले काही महिन्यांपासून वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून डॉ. शीतल आमटेंनी काही कार्यकर्त्यांविरुद्ध आर्थिक अपहाराचे आरोप केले होते.

[removed][removed]'War and Peace'#acrylic on canvas.
— Dr. Sheetal Amte-Karajgi (@AmteSheetal) November 30, 2020
30 inches x 30 inches. pic.twitter.com/yxfFhuv89z