मुंबई - हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मालवी मल्होत्रा या अभिनेत्रीवर मुंबईतील अंधेरी भागात प्राणघातक चाकू हल्ला झाला आहे. तिच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मालवी मल्होत्राच्या शरीरावर तीन वार केले आहेत, मालवीवर झालेल्या हल्ल्याची तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती आहे. एकतर्फी प्रेम करणारा योगेशकुमार महिपाल सिंग हा हल्लेखोर मालवीला एका निर्माता म्हणून भेटला होता. एकदोन वेळा त्याने तिची भेट घेतली. परंतु त्यानंतर या आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागला. मात्र अभिनेत्री मालवीने त्याला नकार दिला होता. यातून तिच्यावर त्याने चाकूने वार केले. तिच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी आरोपीने वार केल्याची सांगण्यात आले आहे.

तक्रारीत मालवी म्हटले, की २५ तारखेला ती शूटिंग संपवून दुबईहून परतली तेव्हा देखील तो तिच्या बिल्डिंगखाली होता. त्यामुळे त्यानंतर ती घराबाहेर न पडता घरीच थांबली. २६ ऑक्टोबरच्या रात्री सातबंगला याठिकाणच्या कॅफे कॉफी डेमधून ती एकटी पायी चालत घरी जात होती, त्यावेळी अंधेरी पश्चिममधील वर्सोवा याठिकाणी त्याने ऑडीमधून येऊन तिला गाठले. तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्यानंतर त्याने खिशातील चाकू काढून तिच्यावर हल्ला केला. या इसमाने तिच्या डाव्या हातांच्या बोटावर, उजव्या हाताच्या मनगटावर, पाठीत हल्ला केला. तिच्या ओरडण्याने त्या ठिकाणचे लोक धावून आले तोपर्यंत तो तिथून पळून गेला. काही व्यक्तींनी तिला रिक्षामधून रुग्णालयात भरती केले.

मालवीने तेलुगू आणि मल्याळम सिनेमात काम केले आहे. हिंदी सिनेमात देखील ती झळकली आहे. कलर्सवरी उडानमध्ये देखील तिने काम केले होते.