मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच बारावीचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणे आवश्यक होते. परंतु, महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घोषीत होणार आहे, अशी माहिती मिळते आहे.
बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर केले आहे. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवता येणार आहे.

बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?
स्टेप 1: http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा.
स्टेप 2: यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा.
स्टेप 3: त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा.
स्टेप 4: यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल.