लाईफस्टाईल - सकाळी गरम पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत. यामुळे केवळ शरीरातील पचनप्रणाली सुधारत नाही करत, तर शरीराच्या चयापचय प्रक्रियेस गती मिळते. जर चयापचय चांगलं असेल तर त्यामुळे वजन नियंत्रित होतं. एवढंच नव्हे तर गरम पाणी पिण्यामध्ये इतरही अनेक गुणधर्म आहेत. ज्यामुळे बहुतेक शारीरिक समस्या देखील बऱ्या होतात. जर कोमट पाण्यात थोडी हळद मिसळली तर ते अधिक प्रभावी औषध म्हणून काम करतं.

पचन समस्येवर उपयुक्त: सकाळी हळद पाण्यातून घेतल्याने पचन प्रक्रिया सुधारते. अ‍ॅसिडिटीसारख्या समस्याही बर्‍या होतात. बद्धकोष्ठता समस्या देखील या औषधाने बरी होते.

जळजळ आणि सूज कमी होते : हळदीमध्ये कर्क्युमिन घटक असतो. जे शरीरात कोणत्याही प्रकारची जळजळ किंवा दाह कमी करण्यास उपयुक्त आहे. कोमट पाण्यातून हळद घेतल्यास शरीरावर काही इजा झाल्यास ती लवकर बरी होते आणि शरीरात कोणत्याही ठिकाणी जळजळ किंवा सूज येत असल्यास हे औषध खूप प्रभावी आहे.

(संग्रहित फोटो)

मधुमेहींसाठी उपयुक्त: मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे एक उत्तम औषध आहे. कोमट पाण्याबरोबर हळद घेतल्यास शरीरात साखरेची पातळी कमी होते. टाईप 2 मधुमेह रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. नियमित सेवन केल्याने टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांची लक्षणंही सुधारतात.

मेंदूसाठी गुणकारी: ज्या लोकांना अल्झायमरची समस्या असते त्यांच्या शरीरात संप्रेरक पातळी देखील कमी होण्यास सुरवात होते. मेंदूशी संबंधित समस्या असल्यास हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन घटक शरीरातील संप्रेरकाच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करतं. म्हणून दररोज गरम पाण्यातून हे सेवन करणं चांगलं ठरेल.

(संग्रहित फोटो)

कर्करोगापासून बचाव : कर्करोग रोखण्यासाठी हळदीचं नियमित सेवन खूप प्रभावी आहे. हळदीमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. याव्यतिरिक्त, हळद अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असतं. जे कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास अडथळा आणतात. हळद आणि गरम पाण्यातून सेवन केल्यानं शरीरात कोणत्याही प्रकारचा ट्युमर येत नाही, जो नंतर कर्करोगाच्या रूपात विकसित होतो.

हृदय निरोगी राहतं : हळद कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी कार्य करतं. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं. ज्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येत नाही. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या समस्यांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.