(संग्रहित फोटो)

लाईफस्टाईल - खेळताना, मस्ती करताना किंवा कधी कधी अपघातामुळे आपल्या चेहर्‍यावर, शरीरावर झालेल्या जखमा आपल्याला दीर्घकाळ त्रासदायक ठरतात. काळे डाग म्हटले की कुणालाही ते नकोसेच असतात. अगदी स्त्री असो वा पुरुष, काळ्या डागांवर उपचाराबाबत सजग असतात. पण, हे काळे डाग येतात कशामुळे? आणि ते न होण्यासाठी काय केलं पाहिजे? असे प्रश्न अनेकांना पडतात. या जखमांच्या खुणांमुळे सौंदर्यातही उणिवा राहतात, मात्र वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आता हे डाग मिटविणे देखील सोपे झाले असून, याकरिता विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. एखादी जखम अथवा भाजल्यामुळे चेह-यावर पडलेल्या डागामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते.

(संग्रहित फोटो)

स्कीन क्रीम : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे क्रीम वापरूनही डाग घालविण्यास मदत होते. मात्र, या प्रक्रियेला पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे आणि त्या प्रकारे त्वचेची काळजी घेणे जरुरी आहे. यापैकी कोणतीही ट्रीटमेंट घेण्यापूर्वी त्याविषयीची माहिती तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(संग्रहित फोटो)

चेहर्‍यावरील जखमांच्या खुणा मिटविण्याचे मार्ग
खरेतर चेहर्‍यावरील जखमांच्या खुणा सहजासहजी मिटविता येत नाहीत, मात्र काही उपचारपद्धतींचा वापर करून आता जखमांचे डाग देखील घालविता येणार आहेत. यामुळे स्त्री, पुरुषांमध्ये असलेला आत्मविश्वास देखील नक्कीच वाढेल. त्वचेच्या सौंदर्यात कुठेही त्रुटी आली, तर सौंदर्याला बाधा येते. त्वचेतील दोष काढून तिला पुन्हा सुंदर बनवण्याच्या शास्त्राला त्वचा सौंदर्यशास्त्र म्हणतात. खालील पद्धतीने जखमेमुळे पडलेल्या डागांवर कायमस्वरूपी उपचार करत पुन्हा नैसगक सौंदर्य प्राप्त करता येणार आहे.

(संग्रहित फोटो)

केमिकल पीलिंग : केमिकल पील या उपचाराला अलीकडे दुसरा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याला म्हणतात लेसर रिसरफेसिंग. यासाठी कार्बन डायऑक्साईड फ्रेक्शनल लेसर किरण वापरतात आणि त्वचेचा डागाळलेला, खड्डे पडलेला भाग वरच्या पेशींचे काही थर नष्ट करून तिथली त्वचा नितळ गुळगुळीत बनवतात. यामुळे चेह-याला नवसंजीवनी मिळते. रिसरफेसिंगची क्रिया काहीशी रस्ते बनवणार्‍या मशीनसारखी असते. चेहर्‍यावर वयपरत्वे उमटणार्‍या रेघा, सुरकुत्या काढून चेहरा अधिक तरुण, टवटवीत बनवणारी ही ट्रीटमेंट वय होण्याची प्रक्रियाच जणू थांबवते.

(संग्रहित फोटो)

लेझर : चेहर्‍यावरील किंवा शरीरावरील जुने व्रण किंवा डाग घालविण्यासाठी या उपचारपद्धतीचा वापर करण्यात येतो. हे व्रण शस्त्रक्रियांमुळे, अपघातांमुळे किंवा भाजल्यामुळे आलेले असू शकतात. हे व्रण किती जुने आहेत, त्वचेमध्ये किती खोलवपर्यंत गेलेले आहेत, कशामुळे हे व्रण उपन्न झाले आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून लेझर उपचारपद्धती केली जाते. या ट्रीटमेंटद्वारे त्वचेचे टीश्यू दुरुस्त केले जातात, ज्यामुळे त्वचेवरील व्रण हलके होत जाऊन, दिसेनासे होतात.

(संग्रहित फोटो)

मायक्रोडर्माब्रेशन : यामध्ये चेहर्‍याच्या वरच्या भागातील त्वचा निघून नवीन त्वचा येते. त्यामुळे काळे डाग नाहीसे होतात.

मायक्रो निडलिंग : यामध्ये जे औषध डाग कमी करण्यासाठी किंवा रंग उजळण्यासाठी वापरतात, ते मायक्रो निडलिंगने चेहर्‍याच्या आत सोडले जातात.

(संग्रहित फोटो)

फिलर्स : फिलर्स ही त्वचेची प्रक्रिया आहे. इंजेक्शनच्या साहाय्याने हे फिलर्स केले जातात. या फिलर्सचा इफेक्ट सहा महिने राहतो. फिलर्स करून घेण्याची प्रक्रिया महागडी आहे. पण, तरीही त्वचेबाबत जागरूक असणारी तरुणाई या महागड़या प्रक्रिया करून घेण्यास पसंती देते. फिलर्स ही सर्जरी नाही. त्यामुळे त्यासाठी फार तयारीची गरज लागत नाही.

(संग्रहित फोटो)

बोटॉक्स : सुरकुत्या घालवण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे बोटॉक्स. त्वचा केवळ कोलाजेन कमी झाल्यामुळे सैल पडते आणि सुरकुतते असं नाही, तर वारंवार हसणे, डोळे मिचकावणे, आठ़या घालणे, भुवया आक्रसणे अशा विविध भावदर्शक स्नायूंच्या हालचालींनीसुद्धा सुरकुत्या पडतात. हे स्नायू शिथिल करायचं काम बोटॉक्स करतं. क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या जंतूंपासून मिळणारा हा पदार्थ त्वचेखाली इंजेक्शनच्या रूपात दिल्यावर तिथले स्नायू शिथिल पडतात आणि चेहरा गुळगुळीत दिसायला लागतो.