(संग्रहित फोटो)

लाइफ स्टाइल -  शरीरावर खाज येणे त्रासदायक असत. शरीरावर खाज येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. वेळेवर आंघोळ न करणे, त्वचेवर धूळ-माती जमणं, दूषित पाणी, किडे चावल्याने, एखादा साबण किंवा प्रसाधन वापरल्याने या किंवा इतर काही कारणांमुळे खाज येत असल्यास आपण खाली दिलेल्या काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

(संग्रहित फोटो)

शरीराला खाज येत असल्यास सर्वात सोपा उपाय म्हणजे कडुलिंबाची काही पाने पाण्यामध्ये उकळवून तुम्ही त्या पाण्याने आंघोळ केल्यास, अंगावरील खाज कमी होते. बहुतांशी वेळा निघून जाते. अंगावर पुरळ आले असल्यास हि कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने पुरळ नाहीसे होतील.

शरीराला खाज येत असल्यास तुळशीच्या पानांचा कापसाने खाज येत असलेल्या ठिकाणी लावल्यास खाज येणे बंद होईल.

(संग्रहित फोटो)

खाज येत असल्यास त्यावर कोरफडाचा गर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल. कोरफडाचा गर त्वचेला थंडावा देण्याचे कार्य करतो.

(संग्रहित फोटो)

ज्यांना शरीराला खाज सुटण्याची समस्या आहे, त्यांनी प्रथम आंघोळीच्या पाण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कधीकधी दूषित पाणी देखील खाज सुटण्याचे कारण असू शकते. आपण आंघोळ करत असलेले पाणी शुद्ध असल्याची खात्री करून घ्या.

(संग्रहित फोटो)

आपल्याला आंघोळीच्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. पाण्यात चांगले मिसळा आणि त्यानंतर या पाण्याने स्नान करा. अंगावरील खाज कमी होण्यास मदत मिळेल. खाज येत असल्यास त्या भागावर नारळाच्या तेलाने मालिश करा असे केल्याने लवकर आराम मिळेल.