(संग्रहित फोटो)

लाईफ स्टाईल - बिस्किट हा पदार्थ इंग्रजांबरोबर भारतात आला आणि भारतात चांगलाच रुजला आयुर्वेदानुसार म्हणाल तर बिस्किट हा आरोग्यासाठी अपायकारक पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार बिस्किट हा शिळा पदार्थ आहे. असा शिळा पदार्थ जो आपण पैसे देऊन विकत घेतो. नेहमी बिस्किटे खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी, अपचन, दमा, मूळव्याध, मधुमेह, मलावष्टंभ, स्थूलता यांसारखे आजार होऊ शकतात.

(संग्रहित फोटो)

हे आजार असणा-यांनी बिस्किटांपासून दूरच रहावे. दूध- बिस्किट किंवा चहा- बिस्किट हा नाश्त्याला पर्याय होऊ शकत नाही. मुलांना भूक लागलेली असताना पोहे, उपमा, शिरा, फळे असे पौष्टिक पदार्थ द्यावे. बिस्किटांवर भूक भागवू नये. बहुतांश बिस्किटे मैद्यापासून बनवलेली असतात. मैदा हा पचायला जड, पोटात चिटकून बसणारा आहे. यामुळे आरोग्याला अपायकारक पदार्थ मानले जाते.

(संग्रहित फोटो)

फायबरसाठी बिस्किटे खाणे वेडेपणा आहे. पालेभाज्या, फळे, गव्हाचा कोंडा, डाळींची टरफले, सलाद यातून आवश्यक फायबरची पूर्तता होते. जवळपास सर्वच बिस्किटांमध्ये डालडा तूपअसते जे वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. गाईचे तूप खाण्यास सांगितल्यावर कोलेस्ट्रॉल वाढेल म्हणून आंबट चेहरा करणारे लोक चवीने बिस्किटे खाताना पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही.