औरंगाबाद / प्रतिनिधी,

पीएनजी ज्वेलर्सने औरंगाबादमधील आपल्या दुसर्‍या स्टोअरचे नुकतेच उद्घाटन केले आहे. काल्डा कॉर्नर येथे असलेल्या या नवीन स्टोअरसह पीएनजी ज्वेलर्सच्या जगभरातील स्टोअर्सची संख्या 39 झाली आहे. या स्टोअरच्या शुभारंभप्रसंगी पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, संचालक पराग गाडगीळ यांच्यासह औरंगाबादमधील प्रख्यात सिंघवी, बोरा आणि पापडीवाल परिवारातील सदस्य उपस्थित होते.


अद्ययावत सुविधांनी युक्त पीएनजी ज्वेलर्सचे नवीन स्टोअर प्रशस्त अशा 2600 चौरस फूट जागेत विस्तारलेले आहे. येथे सोने, चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रशस्त स्टोअरमध्ये आधुनिक काळातील स्त्रियांसाठी उत्कृष्ट समकालीन दागिने उपलब्ध आहेत. हे स्टोअर औरंगाबादच्या काल्डा कॉर्नर येथे असून औरंगाबाद व परिसरातील ग्राहकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करेल, असा विश्‍वास यावेळी गाडगीळ यांनी व्यक्त केला. या स्टोअरची रचना इतर पीएनजी ज्वेलर्स स्टोअर्स प्रमाणेच असून ब्रँड तर्फे प्रदान करण्यात येणारी उच्च मानकांच्या सेवेचा लाभ इथंही घेता येईल. सुरक्षित आणि चिंतामुक्त खरेदीचा अनुभव ग्राहकांना देण्यासाठी पीएनजी ज्वेलर्सने सर्व उपाययोजना केल्या आहेत. स्टोअरच्या शुभारंभानिमित्त केवळ काल्डा स्टोअरमध्ये येणार्‍या ग्राहकांसाठी डायमंड ज्वेलरीवरच्या घडणावळीवर 50ट टक्केपर्यंत सवलत आणि सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 15 टक्केपर्यंत सवलत मिळू शकेल. ही सवलत 30 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान उपलब्ध असेल, असे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.