औरंगाबाद / प्रतिनिधी

  पुण्यनगरी दैनिकाचे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे बाबा व सा. जनसंपर्कचे संपादक वसंत बनसोडे यांना औरंगाबादेत पत्रकारांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिंगोटे बाबा व वसंत बनसोडे यांच्याविषयी मनोगत व्यक्त करुन आठवणींना उजाळा देण्यात आला.

  आवरगावकर कॉम्प्लेक्स जालना रोड येथील दैनिक भूमिसत्ता या कार्यालयासमोर या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन रविवारी दि.30 करण्यात आले होते. यावेळी शहरातील अनेक वृत्तपत्रे व दैनिकांच्या संपादकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रद्धांजली कार्यक्रमात दैनिक लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, दैनिक सकाळचे मराठवाडा आवृत्तीचे संपादक दयानंद माने, दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर, दैनिक पुण्यनगरीचे शहर संपादक दिनेश गुप्ता, दैनिक भूमिसत्ताचे संपादक प्रकाश भगनुरे, सा. निळे प्रतिकचे संपादक रतनकुमार साळवे, अट्टलमतचे रशपालसिंग अट्टल, ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ सुपेकर, सा. दिव्य स्फूर्तीचे राजू वाघमारे, रुपचंद गाडेकर, सुनिता पाटील, ज्ञानेश्‍वर खंदारे, राजेंद्र अजमेरा, रंधे पाटील, प्रा. भारत शिरसाठ, भरत काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कै. मुरलीधर शिंगोटे बाबा व वसंत बनसोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश भगनुरे यांनी तर आभार रतनकुमार साळवे यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भगवान शहाणे, देविदास कोळे, उमेश खडसे, आनंद अंभोरे, गजानन बोदडे, अविनाश पहाडे, कल्याण अन्नपुर्णे, किशोर महाजन, भागवत चव्हाण, बबन सोनवणे, अरुण सुरडकर, विजय अवसरमोल, अब्दुल शेख, अच्युत भोसले, रमेश कोंदलकर, बालासाहेब भगनुरे, शिवाजी ढगे, आर.बी. वानखडे, गुरुप्यारसिंग चानी, संयज झट्टू, विलास ढवळे, योगेशचंद्र पवार, जोगस पाटील, जगदिश जाबा आदींसह विविध दैनिकांचे संपादक व पत्रकारांची उपस्थिती होती.