(संग्रहित फोटो)

लाईफस्टाईल : सध्या द्राक्षांचा सिझन आहे. द्राक्ष हे चविष्ट, पौष्टिक आणि पचण्यास सुलभ असे फळ आहे. द्राक्ष हे ग्लुकोजसाठी प्रसिद्ध फळ आहे. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षे अधिक फायदेशीर ठरतात. जगातील बहुतेक मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतात. म्हणून, हृदयाशी संबंधित रोगांवर उपचार म्हणून द्राक्षे खाल्ली पाहिजेत. काही काळापूर्वी केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर आहे. द्राक्षाने शरीरातलं रक्त वाढण्यास मदत होते. मुलांच्या वाढीसाठी द्राक्ष उत्तम फळ आहे. ताप, पचनशक्ती मंदावणे यावर द्राक्ष गुणाकारी आहे. चला तर मग जाणून घेऊया द्राक्ष खाण्याचे अजून काही फायदे...

(संग्रहित फोटो)
सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे असेल तर दररोज किमान एक वाटी द्राक्ष खाण्याची सवय लावा. द्राक्ष प्रामुख्याने त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. कारण द्राक्ष खाल्ल्याने शरीरात ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते. 

(संग्रहित फोटो)
द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारख्या अनेक घटक असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे ज्या लोकांना हे रोग आहेत त्यांनी जास्तीत-जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ले पाहिजेत.

(संग्रहित फोटो)
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात 2 चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते. सकाळ संध्याकाळी द्राक्ष खाल्याने सांधेदुखीवर आराम मिळतो. 

(संग्रहित फोटो)
भूक लागत नसल्यास आणि वजन वाढत नसल्यास द्राक्ष अवश्य खा. त्यामुळे भूक लागण्यास मदत होईल. द्राक्ष खाल्यामुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाल्यांस त्यांना फायद्याचं ठरणार आहे.

(संग्रहित फोटो)
द्राक्षे शरीरातील क्षारीय तत्त्व वाढवते. याचे सेवन केल्याने लठ्ठपणा, जॉइंट पेन, रक्तांच्या गाठी होणे, दमा आणि त्वचेवर लाल डाग येणे अशा समस्या दूर होतात.

(संग्रहित फोटो)
एका संशोधनास समोर आले आहे की, द्राक्षे ब्रेस्ट कँसरला थांबवण्यात मदत करतात. द्राक्षांमध्ये अँटी कँसर तत्त्व उपस्थित असतात. जे कँसर थांबवण्यात मदत करतात.