छत्रपती शाहू अभियांत्रिकीत आज कॅम्पस मुलाखती
औरंगाबाद / प्रतिनिधी
छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या वर्षीच्या प्लेसमेंट सीझनची सुरुवात कॅपजेमिनी या मल्टिनॅशनल कंपनीच्या कॅम्पस इंटरव्य्हूद्वारे शनिवारी दि.29 होत आहे. या कॅम्पस ड्राईव्हसाठी 2021 मध्ये उत्तीर्ण होणारे छत्रपती शाहू अभियांत्रिकीचे बी.टेक. कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकशेन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेचे विद्यार्थी सहभागी होतील.
मागील दोन वर्षांपासून कॅपजेमिनी कंपनीद्वारे छत्रपती शाहू अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्य्हूद्वारे निवड केली जात आहे. यंदा कोरोनामुळे संपूर्ण निवड प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरुनच या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. सुडो कोड टेस्ट, इंग्लिश कम्यूनिकेशन टेस्ट, गेम बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट, बिहेव्हिरिअल कॉम्पिटन्सी टेस्ट आणि टेक्निकल व एचआर इंटरव्य्हू या पाच राऊंडद्वारे विद्यार्थ्यांची निवड होईल. अंतिम निवड होण्यार्‍या विद्यार्थ्यांना रुपये 3.80 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळेल. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास बी. शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे विभाग प्रमुख प्रा. दिपक पवार, प्रा. संजय कुलकर्णी यांच्यासह इतर सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापकवर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.