(संग्रहित फोटो)
लाईफस्टाई : वजन कमी व्हावे, असे आपल्यापैकी बर्‍याच जणांना वाटत असते. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला जातो, तेव्हा अनेकदा हेवी वर्कआउट्स आणि डाएटिंगचा सल्ला दिला जातो. परंतु, यामुळे आपल्याला स्लिम-ट्रिम बॉडी मिळेलच, असे नाही आणि हे करणे प्रत्येकालाच शक्य होईल असे देखील नाहीये. तसेच वजन कमी करण्यासाठी आपण आहारामध्ये अनेक पदार्थ खाणे देखील टाळतो यामध्ये सर्वात अगोदर तूप खाणे बंद करतो. कारण अनेकांचा असा समज आहे की, तूप खाल्ल्याने आपले वजन काढते. मात्र, खरोखरच तूप खाल्ल्याने वजन वाढते का हे आज आपण पाहणार आहोत. तज्ज्ञ म्हणतात की, तूप ओमेगा-3 फॅट आणि ओमेगा-6 फॅटने समृद्ध आहे आणि आपले वजन कमी करण्यासाठी हे घटक खूप चांगले ठरू शकतात. तुपाचे सेवन करणं आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते. तुपाच्या सेवनामुळे तुम्हाला अन्य शारीरिक फायदे सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतील. याव्यतिरिक्त, तूपातील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडस् आपल्या शरीरातील काही ’इंच’ कमी करण्यात मदत करतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

(संग्रहित फोटो)
तूप डोकोसॅक्सिनोइक अ‍ॅसिडचा चांगला स्रोत आहे. डोकोसॅक्सिनोइक अ‍ॅसिड सर्वात लोकप्रिय ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आहे. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड ही आवश्यक चरबी आहेत, ज्याचे आपण आपल्या आहारात सेवन करणे आवश्यक आहे. हे अ‍ॅसिड आपले शरीर स्वतःहून तयार करू शकत नाही. डोकोसॅक्सिनोइक अ‍ॅसिडचा खास करून कर्करोग, हृदयविकाराचा झटका, मधुमेह, सांधेदुखीसारख्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 

(संग्रहित फोटो)
आयुर्वेदानुसार, तुमचे आयुष्य वाढवण्यासाठी तूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि तुमच्या शरीरास अनेक रोगांपासून वाचवते. तूपाचे असे बरेच महत्त्वपूर्ण फायदे आहेत, परंतु आपल्याला माहित आहे का की, तूप सौंदर्य वाढवण्यासाठी देखील वापरले जाते. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.

(संग्रहित फोटो)
केसांच्या आरोग्यासाठी तूप अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. आपल्या स्काल्पला तुपाने मालिश केल्याने, ते आपल्या स्काल्पला नैसर्गिक ओलावा देते आणि केसांच्या मुळांना बळकट करते. तूप वापरल्याने केस गळती देखील थांबेल. तूप आपले केस चमकदार देखील बनवते आणि त्याशिवाय तुपाचे इतरही बरेच फायदे आहेत, जे आपल्याला कदाचित माहितही नसतील.

ghee-memory

(संग्रहित फोटो)
नियमित योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते, असे म्हणतात. आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, शुद्ध तूप हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.

(संग्रहित फोटो)
रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.