लाईफस्टाईल - प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर दिसावा असे वाटते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. मात्र, वाढत्या वयाचा परिणाम आणि प्रदूषण, ताणतणाव अशा विविध कारणांमुळे चेहर्‍यावर लवकरच सुरकुत्या दिसू लागतात. याचबरोबर डाग, बारीक रेषांनीही चेहर्‍याचे सौंदर्य बिघडू शकते. जर आपल्याला चेहर्‍यावर डाग आणि बारीक रेषा आणि सुरकुत्याबद्दल काळजी वाटत असेल तर आपण यासाठी खास फेशियल योगाची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर इतरही फायदेशीर टिप्स जाणून घ्या.

(संग्रहित फोटो)

फेशियल योगा - आपल्या चेहर्‍यावर एकूण 52 स्नायू असतात. या स्नायूंच्या नियमित व्यायामामुळे चेहरा, मान आणि डोळ्यांचा ताण दूर होतो. यामुळे सैल त्वचेत घट्टपणा येतो. या योगामध्ये, चेहऱ्याच्या मुख्य भागावर दबाव टाकण्याबरोबरच, बोटांनी 5-10 मिनिटे मसाज केल्याने रक्ताभिसरण चांगले होते, कोलेजन तयार होते आणि अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. या योगाबद्दल विशेष म्हणजे ते कधीही केले जाऊ शकते.

(संग्रहित फोटो)

गाल फुगवा आणि हवेला डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे हलवा. जीभशक्य होईल तितकी बाहेर काढा आणि 10-15 सेकंदानंतर परत घ्या. अंगठा व बोटांनी कपाळ आणि भुव्यांच्या दरम्यान असलेली त्वचा घट्ट धरून ठेवा. ओठ बंद ठेऊन गालातल्या गालात हसा.

(संग्रहित फोटो)

फेशियल योगाचे फायदे - तोंडात हवा भरल्यामुळे चेहर्‍याच्या स्नायूंवर दबाव येतो, ज्यामुळे त्यांचे रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर लालसरपणा आणि चमक वाढते. चेहर्‍यावरील अतिरिक्त चरबी कमी होते. विशेषत: जे दुहेरी हनुवटीची तक्रार करतात. ते जिभेशी संबंधित चेहऱ्याचा योग करू शकतात. याशिवाय, चेहर्‍याच्या त्वचेला अधिक ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे विश्रांतीची भावना येते. त्याच वेळी आपण रीफ्रेश होतो.