(संग्रहित फोटो)

लाईफ स्टाईल - शरीरातून घामाचा वास येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. शरीराला येणारा घाम शरीराला थंड ठेवण्यास मदत करत असतो. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो, काखेतून घामाचा दुर्गंध येतो. यावर उपाय म्हणून आपण बऱ्याचदा डिओ किंवा परफ्यूम्सचा वापर करतो. मात्र सारखा सारखा डिओ किंवा परफ्यूम्सचा वापर करणे धोकादायक असत. कारण डीओ आणि परफ्यूमसच्या अति वापरामुळे काखेतील त्वचा काळी पडू शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय.

(संग्रहित फोटो)

1. घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा किंवा लिंबाने आपल्या अंडर आर्म्स मध्ये मसाज करा. यामुळे आपल्या घामाचा वास नाही येणार.

(संग्रहित फोटो)

2. घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी आंघोळ केल्यानंतर बोटांवर थोडेसे नारळाचे तेल घ्या. आणि काखेमध्ये लावा. आपली त्वचा नारळाचे तेल शोषून घेते. दिवसातून दोन ते तीन वेळा असे करू शकता.

(संग्रहित फोटो)

3. बेकिंग सोडा घामाची दुर्गंधी घालवण्यासाठीचा सोपा मार्ग आहे. यासाठी, बेकिंग सोड्याची थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा आणि आपल्या हाताने काखेत लावा. पाच मिनिटे पेस्ट हलक्या हाताने घासून घ्या आणि नंतर धुऊन टाका. असे नियमित केल्यास घामाची दुर्गंधी येणे कमी होईल.

(संग्रहित फोटो)

4. घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी बोटांवर कोरफडीचा थोडासा गर घेऊन काखेत चोळा आणि संपूर्ण रात्र तसेच राहू द्या. कोरफडीचा गर नैसर्गिक पद्धतीनं काखेच आरोग्य सुधारतो. असे केल्याने काखेतून येणारी दुर्गंधी कमी होते.